मुसंडी
प्रेम ,संघर्ष आणि समाज एका सैनिकाची लेखणी - व्यवस्थेला प्रश्न विचारणारी कादंबरी
मराठी वाचकांसाठी खास ऑफर आता ₹399 चे पुस्तक फक्त ₹319 रुपयांमध्ये घरपोच
पुस्तक ऑर्डर करण्यासाठी वरील बटनावरती क्लिक करा

पुस्तक प्रकाशन सोहळा
Meet our team

एका सैनिकाला सलाम
सीमेवर उभा राहून शत्रूशी लढताना, त्याच्या मनात मात्र शब्दांची लढाई सुरू असते. कर्तव्य कठोर असते, दिवस-रात्र गणवेशात जातात, पण आत कुठेतरी एक लेखक श्वास घेत असतो. थकलेल्या रात्री, शांततेच्या क्षणात, तो बंदूक बाजूला ठेवून भावना कागदावर उतरवतो. संघर्ष, वेदना, प्रेम आणि समाजाचं वास्तव — हे सगळं त्याच्या लेखणीतून वाहतं. देशसेवेची शपथ पाळताना, स्वतःचं स्वप्नही जपणारा तो सैनिक-लेखक आहे. ‘मुसंडी’ ही केवळ कादंबरी नाही, ती त्याच्या संघर्षातून जन्मलेली एक जिवंत कहाणी आहे.
अभिप्राय
वाचक मुसंडी बद्दल काय बोलतात
“सैनिक म्हणून देशासाठी उभा राहणारा लेखक समाजातील अन्यायावर लेखणी चालवतो, हे विशेष वाटलं. ‘मुसंडी’मध्ये भावनांचा अतिरेक नाही, पण त्यांची तीव्रता जबरदस्त आहे. प्रत्येक माणसाने वाचावी अशी कादंबरी.”
अमोल भाऊ आणि अविनाश भाऊ या दोघा भावांचा खुप खुप अभिमान आहे .अमोल आणि अविनाश यांची कलाकृती म्हणून ही कादंबरी प्रत्येकाने वाचली पाहिजे, असे सुचवेल फक्त ही एक प्रेम कथा नाही तर जीवन जगण्यासाठी आवश्यक कला गुण कसे रुजतात आणि त्यासाठी करावा लागणारा टोकाचा संघर्ष गरजेचा का आहे ? हे या दोघा भावांनी खुप साधारण वाटणाऱ्या पण अत्यंत शुद्ध अशा रायबा नायकाद्वारे वास्तवात मांडले आहे. मला रायबा सोबत त्याचे वडील पण नायकच वाटतात प्रत्येकाला या कलाकृती चे नायक वेग वेगळे वाटतील आणि हेच या कलाकृती चे यश आहे असे मला वाटते ..... नावाप्रमाणेच ही कादंबरी मनात मुसंडी मारते. भाऊंना पुढील वाटचालीस मनस्वी खुप खुप प्रेममय शुभेच्छा.....
Hii सर माझं नाव शिवम काळे मी तुमची मुसंडी ही कादंबरी वाचली खूप छान वाटली त्यातील शब्द वाक्यरचना भाषा खूप छान ग्रामीण भागातील जशी असते तशी, वाचता वाचता खूप वेळा मी पण माझ्या भूतकाळात गेलो आणि खूप साऱ्या जुन्या आठवणीना उजाळा दिला ते शाळेतील दिवस आणि तेच सारं काही,पण सर मला हे कळलं नाही की त्यातील पात्र हे खरे होते कि काल्पनिक आणि कथा ही सत्य घटने वर होती कि काल्पनिक, पण असो कादंबरी वाचून खूप छान वाटलं आणि कथेचा शेवटही पाहिजे तसाच घडला.तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा .
“मुसंडी वाचताना केवळ कथा वाचत नाही, तर समाजाचा आरसा समोर उभा राहतो. रायबा आणि शीतलचं प्रेम मनाला चटका लावून जातं. ही कादंबरी प्रत्येक मराठी वाचकाने वाचायलाच हवी.”
मुसंडी म्हणजे तुम्ही आम्ही आज जीवन जगत असलेली ही कहानी आहे. या कादंबरीमध्ये प्रत्येकाला आपलं बालपणीचे दिवस आठवतात प्रत्येकाला वाटत आपल्या जीवनाची गोष्ट आहे. कादंबरीमध्ये कोणतेही प्रमाण भाषा लिहिण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही सर्व ग्रामीण टच आहे. तसेच जीवन संघर्ष यामध्ये रेखाट्यात आलेला आहे. अतिशय छान आणि वाचनीयकादंबरी आहे नवीन पिढीला दिशादर्शवणारी ही कादंबरी आहे.श्री कारंडे महादेव बाबासाहेब सहशिक्षक जि प प्रा शाळा औरंगपूर कुकडा तालुका गेवराई जिल्हा बीड.
सप्रेम जय हिंद सर जी 🚩मी तुम्ही लिहिलेले मुसंडी ही कांदबरी वाचन केली,अप्रतिम अतिशय सुंदर लिहिली,तसा मला कांदबरी वाचण्याचा छंद नाही पण माझा वर्ग मित्र याने ही कांदबरी वाचली आणि मला सांगितली की तू ही कांदबरी नक्की वाच,तुझ्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही!मी कांदबरी वाचायला सुरुवात केली आणि त्यात एवढ गुंतत गेलो की कांदबरी हातातून सुटतच नव्हती,पुढे काय होणार पुढे काय होणार ही उत्सुकता वाचन करताना वाटायची...सर माझ्या आयुष्यात जे काही घडलं अगदी तेच ह्या मुसंडी कादंबरीत आपण लिहल,अक्षरशा डोळ्यातून पाणी येत होत,एकटाच कित्येक वेळेस रडलो ही..खरच तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे,सलाम तुमच्या विचाराला कारण तुमच्यामुळे माझा भूतकाळ हुबेहूब समोर आला,फक्त माझा शेवट थोडा वेगळा झाला पण मिळता जुळता नक्कीच होता..तुमचे अगदी मनापासून धन्यवाद,जुन्या आठवणी डोळ्याच्या पाण्याने मन हलक करून आपल्या मुसंडी कादंबरीच्या साह्याने दिल्या,अजूनही कष्ट करून जीवन जगतो,पैसे मिळवले,माणसे कमावले,मान प्रतिष्ठा सर्व आहे पण जे सोबत हवं ते नाही यांची खंत आहे.आणि ती परेपर्यंत असेल😔...असो खरच आपलं मनापासून धन्यवाद करतो व माझं मनोगत थांबवतो 🙏🌹🚩
“आदरणीय सर,
खरं सांगायचं तर ‘मुसंडी’ माझ्यासाठी फक्त एक कादंबरी राहिली नाही… ती एक भावना बनून मनात घर करून बसली आहे.
आपण स्वतःहून मला ही कादंबरी दिलीत, त्या क्षणी कदाचित मला याची खोली समजली नव्हती… पण आज पुस्तक पूर्ण वाचल्यानंतर मनात एक वेगळीच कृतज्ञता दाटून आली आहे. काही भेटी या वस्तू नसतात… त्या मनात कायमस्वरूपी आठवण बनून राहतात — ‘मुसंडी’ माझ्यासाठी तशीच आहे.
कथा वाचताना कितीतरी वेळा मन भरून आलं… काही प्रसंग इतके जिवंत वाटले की नकळत डोळ्यात पाणी आलं. काही ठिकाणी स्वतःचं आयुष्य दिसलं, काही ठिकाणी संघर्ष दिसला, तर काही ठिकाणी आयुष्याने शिकवलेले कठोर धडे पुन्हा आठवले.
एक गोष्ट मात्र मनाला खूप खोलवर लागली — परिस्थिती कितीही कठीण असली, आयुष्य कितीही वाकवण्याचा प्रयत्न करत असलं… तरी स्वतःचं अस्तित्व उभं करता येतं… आणि हाच ‘मुसंडी’ चा आत्मा मनात कायमचा कोरला गेला.
आजकाल पुस्तकं वाचली जातात, फोटो काढले जातात आणि विसरलीही जातात… पण काही पुस्तकं अशी असतात जी वाचून संपतात, तरी मनातून कधीच संपत नाहीत. ‘मुसंडी’ तशीच आहे सर… पुस्तक बंद केलं, पण कथा अजूनही मनात सुरू आहे.
आणि कदाचित म्हणूनच हे सांगावंसं वाटतंय — आपण मला पुस्तक दिलंत, पण नकळत एक विचार दिलात… संघर्षाकडे पाहण्याची नवी नजर दिलीत… आणि मनाला स्पर्श करून जाणारा अनुभव दिलात.
मनापासून धन्यवाद सर… ही भेट मी कायम जपून ठेवेन.
आपल्या लेखणीतून अजून अशाच मनाला भिडणाऱ्या कथा जन्माला येऊ देत… कारण शब्द लिहिणारे बरेच असतात, पण शब्द जगायला लावणारे फार कमी असतात… आणि आपण त्यापैकी एक आहात. 🙏❤️”




